भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील रामपूर येथील तरुणाची हत्या....
![भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील रामपूर येथील तरुणाची हत्या....](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_641c2ac3d1fb6.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके
भंडारा : मोहाडी तालुक्यातील रामपूर येथील तरुणाची शेतातून दूध घेऊन घराकडे येत असताना; हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवार रात्री 9 वा. ही घटना उघडकीस आलीय. गावालगतच्या शेतात मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. प्रदीप लक्ष्मण धांडे (35) रा. रामपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. मोहाडी तालुक्यातील रामपूर-मांडेसर येथील प्रदीप धांडे हा शेतीसोबत पशुपालनाच्या व्यवसाय करीत होता.
22 मार्च रोजी सायंकाळी शेतात बांधलेल्या जनावरांच्या दूध काढण्यासाठी गेला होता. दूध काढल्यानंतर दुधाची बकेट घेऊन घराकडे येण्यास निघाला; त्यावेळेस गावालगत असलेल्या शेतात अज्ञात आरोपींनी डोक्यावर वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन वर्षात रामपूर येथे हत्या झाल्याची ही दुसरी घटना आहे. पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहे.