चाकण परिसरातील मोई गावातील ३० वर्षीय महिलेवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....!

चाकण परिसरातील मोई गावातील ३० वर्षीय महिलेवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार, महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : मोई गावातील पानटपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर इच्छे विरुद्ध बळजबळी करून अत्याचार केल्या प्रकरणी एका मोई गावातच राहणाऱ्या ३० वर्षीय व्यक्तीवर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोई गावात एक ३० वर्षीय महिला भाड्याच्या खोलीत राहत होती. तिचे आरोपीने गुपचूप अंघोळ करतेवेळी अर्धनग्न फोटो काढून पीडित महिलेला २९ मार्च २०२० ला सायंकाळी ६ वाजता आरोपी राहत असलेल्या घराच्या गच्चीवर बोलवले. त्यानंतर आरोपीने तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुझे हे अर्धनग्न फोटो तुझ्या नवऱ्याला व समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देवू लागला.

आरोपीने दिलेल्या धमकीला बळी पडून पीडित महिलेला भोसरी येथील इंद्रायणी नगर येथील लॉजवर नेवून आरोपीने पीडितेच्या इच्छे विरुद्ध संमती शिवाय तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला.

या बाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात निलेश अमृत मोरे (वय-३० वर्षे) रा. मोई, ता. खेड, जि. पुणे यांच्यावर भा. द. वि.३७६(२)(एन) व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाजामध्ये सध्या अशा गुन्ह्याचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. काही महिला सहमतीने ३ ते ४ वर्षे शारीरिक संबंध ठेवतात. अन नंतर शुल्लक कारणावरून असे चुकीचे गुन्हे दाखल करतात. या प्रकरणाची दुसरी बाजू पाहिली असता या पीडित महिलेचे आणि वरील आरोपीचे मागील ३/४ वर्षांपासून प्रेम व नाजूक संबंध सुरू होते. याची कुणकुण पीडितेच्या पतीला लागताच तीने आरोपीला मला तुला सांभाळावे लागेल असा तगादा लावला. यातून त्यांच्यात मतभेद झाले आणि पीडितीने त्याच्यावर गंभीर गुन्हा नोंदवला. यावरून अशा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोघांना समोरासमोर घेऊन त्यांच्या चुका दाखवून त्यांचे सामोपदेशन करायला हवे. तरच अशा गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल नाहीतर अशा प्रकरणातून कुटुंबे व पुढे जाऊन काही व्यक्तीचे आयुष्य संपल्या शिवाय राहणार नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड हे करत आहेत.