कळस बुद्रुक गावातील कळसेश्वर मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन चोरी करणारे ४ चोरटे मुद्देमालासह जेरबंद, अकोले पोलीसांच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक…!
![कळस बुद्रुक गावातील कळसेश्वर मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन चोरी करणारे ४ चोरटे मुद्देमालासह जेरबंद, अकोले पोलीसांच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक…!](https://news15marathi.com/uploads/images/202210/image_750x_6338062f3808a.jpg)
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : तालुक्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि कळस गावचे आराध्य दैवत असलेल्या कळसेश्वर मंदिरात ११ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास मंदिरातील देवी देवतांचे सोन्याचे दागिने व चांदीचा मुकुट व मदिरांत झोपलेल्या भाविकाचा मोबाईल चोरीची घटना घडली होती. घटना घडल्याची माहिती मिळताच तात्काळ घटना ठिकाणी अकोले पोलीसांनी धाव घेवुन घडलेली घटनेची माहिती घेवुन कळसेश्वर मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची माहिती घेण्यात सुरुवात केली होती. तसेच तात्काळ विवेक बाळासाहेब वाकचौरे यांचे फिर्यादीवरुन अकोले पोलीस स्टेशनला गुरनं ४२५/२०२२ भा.द.वि कलम ४५७,३८०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घडलेला प्रकार हा गंभीर स्वरुपाचा व भाविकांच्या भावना तीव्र करणारा असल्याने सदर बाबत पोलीस अधिक्षक अ.नगर यांनी सखोल तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर तात्काळ तीन तपास पथक तयार करुन अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला.
मंदिरात मिळुन आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तसेच गोपनिय बातमीच्या आधारे कळस गावातील अभिषेक मारुती गवांदे याने त्याचे साथीदारांसह मिळुन सदरची चोरी केल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने त्याचा कळस, सिन्नर, शिर्डी, संगमनेर येथे शोध घेवुन त्यास संगमनेर मधुन ताब्यात घेण्यात आले.१)अभिषेक मारुती गवांदे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचेकडे गुन्ह्यांचे अनुशंगाने केलेल्या चौकशीत त्याने त्याचे साथीदार २)अनिकेत रामनाथ वाकचौरे, ३)प्रकाश सुरेश लाड तीनही रा. कळस, ता. अकोले ४)शाम तुकाराम केंग रा. धुमाळवाडी ता. अकोले यांचे मदतीने सदरची चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर वरील सर्व आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पंरतु चोरीच्या मुद्देमालाबाबत उपयुक्त माहिती देत नसल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात येवुन १६ सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची २० सप्टेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
पोलीस कोठडीमध्ये असताना सदर आरोपीकडे चौकशी अंती पुढील प्रमाणे गुन्ह्यात चोरी झालेले सोन्या चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाईल फोन व हत्यार पुढील प्रमाणे जप्त करण्यात आले आहे. कळसेश्वर मंदिरातुन चोरीस केलेले १) सोन्याची नथ, २) सोन्याचे मणि मंगळसुत्र ३)सोन्याचे नेकलेस ४) चांदीचा मुकुट ५) फिर्यादी यांचा मोबाईल फोन ६)सदर गुन्हयात चोरी करीता वापरलेली मोटार सायकल ७) आरोपींचे मोबाईल फोन व रुपये रोख रक्कम व चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकुण १,९८,३००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपी हे सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असुन त्यांचे कडुन अजुन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस येण्यास सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत झाल्याने नागरिकांना विशेषतः अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायतींना याव्दारे आवाहन करण्यात येते की, गावाचे सुरक्षेतीतच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाणी, चौकात, मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन गावात ग्रामसुरक्षा दल कार्यान्वयीत करुन घ्यावे. तसेच कुणीही संशयीत इसम दिसुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास खबर द्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक, अ.नगर यांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे, महिला पोउपनिरी फराहनाज पटेल, अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ महेश आहेर, सफौ शेख, पोना विठ्ठल शेरमाळे, पोना राम लहामगे, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ विजय खुळे, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ सुनिल गवारी, पोकॉ संदिप भोसले, होम.शार्दुल वऱ्हाडे तसेच अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोना फुरकान शेख यांनी केली असुन पुढील तपास हे पोलीस नाईक राम लहामगे हे करीत आहे.