पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक.! 12 नक्षलवादी ठार एक जवान जखमी...
![पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक.! 12 नक्षलवादी ठार एक जवान जखमी...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_6697eba6451df.jpg)
या घडीची एक मोठी अपडेट समोर आली आहे. गडचिरोलीत पोलिसांना नक्षलविरोधी कारवाईत मोठं यश मिळालं असून, ह्यात 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.
विशेष म्हणजे जेव्हा ही कारवाई झाली त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्याच वेळी ही कारवाई करण्यात आली. शिवाय त्यांच्या बरोबर अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतही होते. त्यांना या कारवाई माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना कारवाईत सहभागी असणाऱ्या जवांनासाठी 51 लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे.
या कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. तर एक जवानही जखमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलवाद्यां विरोधात एक धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला गेला. त्यानंतर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार फायरिंग झाली. त्यात 12 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलं. गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश मानले जाते. C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांनी ही संयुक्त पणे कारवाई केली.
या चकमकीत सी-६० पार्टीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पाटील जखमी झालेत. त्यांच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. चकमकीत जखमी झालेल्या उपनिरीक्षक सतीश पाटील यांना हेलिकॉप्टरने कांकेर येथून गडचिरोलीकडे आणण्यात आले. C60 चा एक PSI आणि एक जवान गोळीबारात जखमी झालेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.