चोरट्याचा पोलीस ठाण्यातच डल्ला? शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष...

चोरट्याचा पोलीस ठाण्यातच डल्ला? शिरूर अनंतपाळ पोलीस  ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ

शिरूर अनंतपाळ येथील पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात जमा असलेले मोटरसायकलचे रिंग, टायरसह १० ते १२ हजारांच्या सामानाची चोरी ठाण्याच्या परिसरातून झाल्याने ही चोरी, की पोलीसांचा दुर्लक्षपणा असा प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे पोलीस ठाणेच सुरक्षितच नसेल तर तालुक्याची सुरक्षा कशी होईल अशी चर्चा नागरिकांत होताना दिसत आहे. 

 व्हिवो : - शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड वर्षापुर्वी ज्याचा क्रमांक एम एच २४, ए एम १०६९,असून ही गाडी पोलीसांनी जप्त केली होती. त्यानंतर गाडीचे मालक माधव सुवरसे यांना कोर्टाची परवानगी आणली की गाडी देण्यात येईल असे सांगितले. त्यावेळेस गाडी व्यवस्थित होती.  त्या नंतर रितसर कोर्टातून परवानगी घेवून आले.  पोलीसांनी ही रितसर गाडी घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यावेळेस माधव सुरवसे गाडीकडे जाऊन बघतात तर गाडीचे पुढचे टायर, रिंग व शॉक्पसर गायब झालेले दिसून आले. परत पोलीस कर्मचाऱ्यांना गाडीचे पुढचे टायर, रिंग व शॉक्पसर गायब झाल्याचे सांगितले असता त्यांना अशा बाबीकडे लक्ष द्यायला आमच्या कडे वेळ नसल्याचे सांगून हाकलून दिले. मग गाडीचे अनेक भाग कोणी काढले व का काढले असे सवाल उपस्थित करीत पोलीस ठाणेच सुरक्षित नसेल तर हे पोलीस  तालुक्यावर लक्ष कसे देतील असा प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे.

तरी याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लक्ष देवून कार्यवाही करतील का याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.