प्रयोग शाळा सहायकाला ४०० रुपयाची लाच घेताना अटक.!
![प्रयोग शाळा सहायकाला ४०० रुपयाची लाच घेताना अटक.!](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66974364218f1.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
उदगीर तालुक्यातील तोगरी येथील जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रयोग शाळा सहायक जयप्रकाश बालाजी बिरादार वय - ४५ वर्षे या लोकसेवकाला; शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी ४०० रू लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तक्रारदार यांनी लाडकी बहीण योजनेकरीता; बहिणीचा शाळा सोडण्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. पण लोकसेवकाने ४०० रू. ची लाचेची मागणी केली होती. त्यानूसार लाच घेताना रक्कमेसह रंगेहाथ पकडून आरोपीस ताब्यात घेतले असून, देवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्यूरो डॉ. राजकुमार शिंदे पोलीस अधिक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष बार्गे पर्यवेक्षण अधिकारी लातूर यांनी कार्यवाही केली आहे.