क्राईम : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट-३ ची कौतुकास्पद कामगिरी, विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले..!

क्राईम : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट-३ ची कौतुकास्पद कामगिरी, विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्मशानभूमी जवळ परप्रांतीय कामगारास लुटण्याचे उद्देशाने चाकूने भोकसणाऱ्या व मोटरसायकल चोरी करणाऱ्या बाल गुन्हेगारास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट -३ च्या पथकाने अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून,रविवारी(दि. १२) रोजी रात्री ७:१० वाजताच्या सुमारास महाळुंगे स्मशानभुमी तळया जवळ एका इसमास एका अनोळखी इसमाने मोबाईल स्नॅचिंग करीत असताना प्रतिकार केल्याने चाकुने पोटावर, पाठीवर, मांडीवार चाकुने वार करुन गंभीर जखमी करुन पळून गेला. 

सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पोहवा सानप, पो.शि.कोळेकर, पोलीस शिपाई मेरगळ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून १७ वर्षीय विधीसंघर्षीत बालक रा.कांची सोसायटी फ्लॅट नंबर १०२, एम विंग चाकण ता.खेड जि.पुणे यास ताब्यात घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यास युनिट-३ च्या पथकाला यश आले आहे. तसेच सदर आरोपीकडुन १. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, २. दिघी पोलीस ठाण्यात असे २ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर विधीसंघर्षीत बालकावर यापुर्वी खुनाचा प्रयत्न १, आर्म अँक्ट ४,२५ प्रमाणे २ गुन्हे, मोटर सायकल चोरीचे विविध पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल आहेत.  

सदर कामगिरी गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस हवालदार विठ्ठल सानप, ऋषिकेश भोसूरे, संदीप सोनवणे, पोलिस अंमलदार योगेश्वर कोळेकर,रामदास मेरगळ, राजकुमार हनुमंते, मनोज साबळे, राहुल सूर्यवंशी यांनी केले आहे.