क्राईम : चाकण पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी, सराईत चोराकडुन सुमारे ८,२५,००० रुपये किंमतीच्या एकुण १५ चोरीच्या मोटार सायकली जप्त करून आरोपीकडून१६ वाहन चोरीच्या गुन्हयांची उकल..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : चाकण पोलीस ठाण्याच्या हददीत मोठया प्रमाणात औदयोगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तीकडुन मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ०३ बापु बांगर, चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरी बाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांना सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके संजय सोळंके यांनी चाकण पोलीस ठाणे हददीतील गुन्हे उघडकरण्या बाबत तपास पथकाचे अधिकारी व अमंलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले. तपास पथकाचे धडाकेबाज कामगिरी बजावणारे अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे तसेच पथकातील अमंलदार यांनी वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवून सदर परिसरातील तसेच चोरटा येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील सुमारे १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेज तपासत असतांना काही फुटेजमध्ये रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगन थेरपाळ ता. पारनेर जि. अहिल्यानगर) हा सराईत मोटार सायकल चोरी करुन नेत असतांना निष्पन्न झाले होता. अशोक मधुकर सोनवणे याचा शोध घेत असतांना तो एका चोरीच्या मोटार सायकलसह मिळुन आला, त्यास चाकण पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन तसेच तो वास्तव्य करीत असलेल्या परीसरात तपास करुन तांत्रीक बाबींचा अभ्यास करुन आरोपीने चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली चाकण पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीकडुन एकुण ८,२५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
चाकण पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व मोटार सायकली आरोपी अशोक मधुकर सोनवणे यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीला चाकण पोलीसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने चाकण पोलीस ठाणे हद्दीतील १) गुरनं ७६ / २०२५ बी एन एस ३०३ ( २ ) प्रमाणे २) गुरनं २२७ / २०२५ बी एन एस ३०३(२) प्रमाणे, ३) गुरनं ९०८/२०२४ बी एन एस ३०३ (२) प्रमाणे या गुन्हयातील मोटार सायकली चोरी केलेल्या असल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीकडून अजूनही सखोल चौकशी करून मोटार सायकली जप्त करण्याचे काम चालु असुन आरोपी अशोक मधुकर सोनवणे याचेकडुन चाकण पोलीस ठाण्याकडील एकुण १४ मोटार सायकल चोरीचे गुन्हे तसेच वडगाव मावळ व शिक्रापुर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण यांचेकडील प्रत्येक ०१ गुन्हा असे एकुण १६ मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांची आरोपीकडून उकल करण्यात आलेली आहे. आरोपीकडून गुन्हयांची उकल करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याच्या डी.बी पथकाकडून सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकात महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त उपआयुक् परिमंडळ-३ बापू बांगर, सहा.पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, पोलीस अंमलदार सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, राहुल सुर्यवंशी, सुनिल भागवत, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, महेश कोळी, शिवाजी लोखंडे, अमोल माटे, राजु जाधव, रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, विकास तारु यांनी केलेली आहे.