जि.प. शाळलेतील स्वयंपाकी व मदतनीस यांच्यावतीने; जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन...
![जि.प. शाळलेतील स्वयंपाकी व मदतनीस यांच्यावतीने; जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन...](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66f7795f67448.jpg)
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांना 10 हजार रु. मानधन द्या; अशा विविध मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२7 सष्टेबर रोजी स्वयंपाकी व मदतनीस'यांच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी मदतनीस यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. शासनाने स्वयंपाकी व मदतनीस यांना 10 हजार रुपये मानधन द्यावे; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणेश द्या.! अशा विविध मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मुनिर पठाण यांच्या नेतृत्वाखाली दि.२7 सष्टेबर रोजी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर; जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी व मदतनीस यांच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने स्वयंपाकी व मदतनीस महिला सहभागी झाल्या होत्या.