जाणवा ते कोरंभी रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - राष्ट्रवादी युवकचा प्रशासनाला इशारा...

जाणवा ते कोरंभी रस्ता त्वरित दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू - राष्ट्रवादी युवकचा प्रशासनाला इशारा...

NEWS प्रतिनिधी - सुधीर शिवणकर

गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर दुर्गम आदिवासीबहुल तालुका म्हणून; अर्जुनी मोरगाव तालुक्याची ओळख आहे. तर गाव तिथे रस्ता हे ब्रीद शासन नेहमी वापरत असून, पुरोगामी महाराष्ट्रात गावकऱ्यांना पक्का रस्ता सुद्धा मिळू नये ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल अशी खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यातील बहुसंख गावांना जोडणारे रस्ते; जागोजागी तुटलेले फुटलेले असून, ग्रामस्थ / विद्यार्थी यांना हे रस्ते त्रासदायक ठरत आहेत. तालुक्यातील जाणवा या गावावरून जाणारा कोरंबी रस्ता तसेच येगाव रस्ता जागोजागी फुटलेल्या अवस्थेत असून, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी दैनिअवस्था या मार्गाची झालीय. या गावातील गावकरी तसेच शाळेला जाणारे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अनेकदा शासनाकडे पाठपुरावा करून या रस्ता दुरुस्तीची मागणी केलेली आहे. मात्र अजून पर्यंत रस्त्याचे काम न झाल्याने, गावकरी त्रस्त आहेत. रस्त्याला जागोजागी खड्डे तर पडले आहेतच; शिवाय त्यात भरीस भर म्हणजे रस्त्यावर असलेले मोरीचे पाईप फुटलेले असल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं हा रस्ता येत्या पंधरा दिवसात व्यवस्थित करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सरपंच किशोर ब्राह्मणकर यांनी दिला आहे.