धनगर समाजाचे उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने; समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
धनगर समाजाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली असून, धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
धनगर समाजाचा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद, 342 मधील यादी क्रमांक 36 वर अनुसुचित जमाती एसटी प्रवर्गा मध्ये समावेश आहे. परंतू, धनगर चा हिंदी अनुवाद धनगड असल्यामुळे, र ऐवजी ड झाल्याने; धनगर समाज मागील 70 वर्षापासून अनुसुचित जमातीच्या संचित आहे. केद्र सरकारणे धनगड चा धनगर अशी दुरुस्ती करण्यात यावी. तसेच चौंडी तालुका जामखेड येथे धनगर समाजाचे बांधवानी मागील बारा दिवसापासून चालू केलेले उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांसोबत त्वरित चर्चा करावी अदि मागण्यासाठी धनगर समाजाच्यावतीने; हिंगोलीतील कळमनुरी येथील उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली व विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधवाची उपस्थिती होती,