पाणी हक्कसंघर्ष समितीच्यावतीने शेनोडी येथे जलसमाधी आंदोलन...

पाणी हक्कसंघर्ष समितीच्यावतीने शेनोडी येथे जलसमाधी आंदोलन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

ईसापुर जलायशातून शेनोडी - रामवाडी ता. कळमनुरी उपाससिंचन योजना राबविने व कयाधु नदी वर बंधारे बांधण्याची मागणी घेऊन; पाणी हक्कसंघर्ष समितीच्यावतीने शेनोडी येथे दि. 21फेब्रुवारी रोजी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

तर विविध मागण्याचे निवेदन कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

शेनोडी रामवाडी उपासा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या उपाययोजनेमध्ये समावेश करून, निधि उपलब्ध करून द्यावा. कयाधु नदीवर उच्च पातळीचे बंधारे होणार नसल्यामुळे, विशेष बाब म्हणून, लहान बंधारे पण उच्च पातळी बंधाऱ्याप्रमाणेच स्वयंचलित गेट बसवून, बंधारे बांधण्याला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. ईसापुर जलाशयातून शेनोडी रामवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली उपसा सिंचन योजना राबविणे. कयाधू नदीवर बंधारे बांधण्याबाबत उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात यावे. या  मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने सतत विविध आंदोलन करण्यात येत आहे.