वलांडी येथील घटनेचा देवणी शहरातील बोरोळ चौकात जाहिर निषेध...
![वलांडी येथील घटनेचा देवणी शहरातील बोरोळ चौकात जाहिर निषेध...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65c1b58fbb09a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, देवणी
लातूर - देवणी शहरातील बोरोळ चौकात तालुक्यातील विविध गावातील महिलांनी एकत्र येवून वलांडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या कृत्याचा जाहिर निषेध करीत; अमानूष कृत्य करणाऱ्या तरुणाला फाशी द्यावी आणि कुंटुंबियाना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ देवून त्यांचे समुपदेशन करावे यासाठी भव्य मोर्चा काढून तहसील प्रशासनाला सोमवार (ता.5) रोजी निवेदन देण्यात आले आहे .
हा मोर्चा लासोना चौक ते पोलीस स्टेशन, मुर्गी चौक ते बोरोळ चौकापर्यंत काढण्यात आला . यात शेकडो महिलांचा समावेश होता .
सर्व महिलानी या घटनेचा निषेध नोदविला त्यानंतर; तहसील प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून पेषकार ओमप्रकाश चिल्ले, मडळधिकारी अनिता ढगे, तलाठी लक्ष्मण काबळे यांना या घटनेचे निवेदन देण्यात आले. विविध गावातून आलेल्या महिला, युवती, सामाजिक कार्यकर्त्या, कार्यकर्ते तसेच डॉक्टर कीर्ती घोरपडे, कुशावर्ता बेळे, अँड.रुक्मिणी सोनकांबळे, भाग्यलक्ष्मी मळभागे, सत्यभामा घोलपे, कचराताई ईसाळे, प्रेरणा जाधव सत्यशिला सरवदे, सरोजा शिंदे यांच्यासह तरुणीसह महिला मोठया प्रमाणात मोर्चात सहभागी झालेल्या होत्या. यावेळी पोलीस उपनिरिक्षक शंकर पाटिल यांच्यासह महिला व पुरुष कर्मचारी तैनात करण्यात आले होते.