विविध मागण्यांसाठी मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने निलंगा येथे मोर्चा
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर
विविध मागण्यांसाठी मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने 19 सप्टेबर रोजी निलंगा येथे दंडवत घालत मोर्चा काढण्यात आला. निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर दंडवत घालून उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. एस. टी. प्रवर्गासाठी रक्त नात्याचा जी.आर. काढावा, जात प्रमाणपत्र सुरळीत द्यावे आणि वैधता सुलभतेने मिळावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अंदोलन हाजारो महिला पुरुष सहभागी झाले होते