जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज घटनेचा; उमरखेड येथे रस्ता रोको आंदोलन करुन निषेध...

जालना जिल्ह्यातील लाठीचार्ज घटनेचा; उमरखेड येथे रस्ता रोको आंदोलन करुन निषेध...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा देण्यात यावा यासह; अन्य मागण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे.! दि. 29 ऑगस्ट पासून सुरू मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते. मात्र या आंदोलनाला (उपोषणाला) हिंसक वळण लागून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर व महिलावर झालेल्या लाठी चार्ज केल्याने, घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ; उमरखेड शहरातील माहेश्वरी चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला असून, न्याय मागणाऱ्या बांधवावर लाठी चार्ज करून रक्तबंबाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कोणाचा आदेशानुसार मारहाण केली याची चौकशी व्हावी अशी मागणी करत; घटनेचा निषेध करण्यासाठी 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. माहेश्वरी चौकात  रस्ता रोको करण्यात आला होता.