ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना नांदेडमधून वाढता पाठिंबा...

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना नांदेडमधून वाढता पाठिंबा...

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे नांदेड

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना नांदेड मधून देखील ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. लक्ष्मण हक्के यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण सुरू केले आहे.

या आंदोलनाला मराठवाड्यातून मोठा पाठिंबा मिळतोय. नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव यांनी हाके यांना पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

सकल ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकत्र येत घोषणाबाजी करत हे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले.दरम्यान ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी समाज देखील आपली ताकद सरकारला दाखवीन असा इशारा नांदेड येथील सकल ओबीसी समाजाने दिला आहे.