शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा टोमॅटो प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा - सभापती कड
![शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा टोमॅटो प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा - सभापती कड](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e94b34b0312.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ झाला असून चांगल्या प्रतीचा टोमॅटो प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांना चांगला दर द्यावा तसेच शेतकऱ्यांनाही काही अडचणी असल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी केले.
ते दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो खरेदी-विक्रीचा शुभारंभ करण्यात आलं त्याप्रसंगी बोलत होते. यावेळी सभापती प्रशांत कड व ज्येष्ठ शेतकर्यांच्या हस्ते करण्यात आला.
पहिल्याच दिवशी शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी आपणला होता.शुभारंभ प्रसंगी रू.३१०० रुपये याप्रमाणे उच्च दर मिळाला असून सरासरी ६०० ते ७५० रुपये प्रती क्रेट दर मिळाला आहे. याप्रसंगी उपसभापती योगेश बर्डे, संचालक कैलास मवाळ,पांडूरंग गडकरी,गंगाधर निखाडे, शामराव बोडके,दत्तू राऊत,नरेंद्र जाधव, गुलाबतात्या जाधव,सचिव जे.के. जाधव,आर.एस.गणोरे,गुलाबराव जाधव,शरद अपसुंदे,भास्कर वसाळ, नाना धात्रक,विनायक शिंदे,राजु घडवजे, सचिन गायकवाड, रंगनाथ जाधव,प्रताप देशमुख,गणेश देशमुख, मनोज मवाळ,नवान मन्सुरी, विजय ढुमणे, किरण अपसुंदे,पप्पु मेधणे, चंद्रकांत जाधव, विलास शिंदे, समाधान जाधव आदींसह संचालक मंडळ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.