पाटणबोरी येथे किसान सभेचा मोर्चा.! विविध मागण्यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन...

पाटणबोरी येथे किसान सभेचा मोर्चा.! विविध मागण्यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन...

प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पाटणबोरी येथे आज (10 ऑक्टोबर) रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने; राज्यभर आंदोलनाला पाठिंबा देत.! पाटणबोरी येथे नायब तहसीलदार कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापसाचे हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांचे हातून निघून गेले; अशा परिस्थितीमध्ये शेतकरी फार मोठ्या अडचणी मध्ये सापडलेला आहे. लागवडीसाठी लागलेला खर्च निघणार नाही. अशीच सर्वत्र परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांवर प्रचंड असा कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असताना; केवळ तूटपूंजी  मदत जाहीर करण्यात आली असा आरोप करण्यात आला.

या मोर्चामध्ये किसान सभा जिल्हा कमिटी सदस्य व शेतकरी शेतमजूर, अतिक्रमणधारक किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रशेखरसिडाम यासह अनेक किसान सभा सदस्य अतिक्रमणधारक - शेतकरी - शेतमजूर सहभागी झाले होते.