केंद्र सरकाचा विरोधात वाहनचालकाचा खडकी येथे आंदोलन...

केंद्र सरकाचा विरोधात वाहनचालकाचा खडकी येथे आंदोलन...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - परशुराम निखळे

पुणे (दौड) : केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कायद्यात वाहनांचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून वाहन चालक पळून गेल्यास त्यास दहा वर्षांची शिक्षा व सात लाख रूपये दंडाची तरतूद करण्यात आली असल्याने या जाचक कायद्याच्या विरोधात वाहन चालकांडून सोमवारी ( ता.१ ) दुपारी दौंड तालुक्यातील खडकी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटून पुण्याकडे जाणारा मार्ग बंद केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना घडून खूप वेळ उलटूनही घटनास्थळी पोलिसांचा व इतर यंञणाचा पत्ता नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दौंड तालुक्यातील खडकी हद्दीतील सोनारनाला व बबीदा ढाबा परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटून केंद्र सरकारच्या नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ कायद्याचा वाहन चालकांनी निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या जुन्या भारतीय दंड संहिता कायद्यात बदल करून अपघातानंतर चालक पळून गेल्यास त्याला सात लाख रूपये दंड आणि दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा वाहन चालकांवरती अन्याय करणारा असून दुसऱ्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्यांना ही दंडाची रक्कम भरणे अशक्य आहे. सात लाख रूपये दंड भरण्याची परिस्थिती असती तर दुसऱ्याच्या वाहनावर कामाला राहीलो असतो का ? असा संतप्त सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला.