विविध मागण्यांसंदर्भात वडार समाजाच्यावतीने लातूरात रास्तारोको आंदोलन
![विविध मागण्यांसंदर्भात वडार समाजाच्यावतीने लातूरात रास्तारोको आंदोलन](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66eee2b5b2c0c.jpg)
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर
वडार समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या सहा - सात दिवसांपासून तुकाराम माने हे लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून, प्रशासनाने या उपोषणाची अद्याप दखल घेतली नाही.
या उपोषणाला पाठिंबा देत सकल वडार समाजाच्यावतीने आज 21 सप्टेंबर रोजी लातुरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरातील लातूर - औसा महामार्गावर जवळपास एक तास हे आंदोलन करण्यात आले. वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात यावे, विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वसतिगृह व्हावे, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.