ट्रॅव्हल्स बसचा वासनगाव पाटी जवळ अपघात; पाच ते सात प्रवासी जखमी...

ट्रॅव्हल्स बसचा वासनगाव पाटी जवळ अपघात; पाच ते सात प्रवासी जखमी...

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर

पुण्यावरून लातूरला येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचा लातूर तालुक्यातील वासनगाव पाटी जवळ 21 सप्टेंबर रोजी अपघात झाला आहे.

चालकाचा ताबा सुटल्याने खाजगी ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने, हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात ट्रॅव्हल्स मधील पाच ते सात प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सर्व जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.