मोठी बातमी: चाकण-आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी चौक वाय जंक्शन येथे अपघातात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
खराबवाडी : चाकण-आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी चौक,वाय जंक्शन येथे आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एकास टँकरची पाठीमागून धडक बसल्याने वृद्धाचा त्यात जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात राघु ज्ञानोबा कड (वय.५७ वर्षे,रा.संतोषनगर,भाम,ता.खेड)असे मृत्युमुखी पडलेल्याचे व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी सचिन अरुण कड (वय.३५वर्ष,रा.संतोषनगर, भाम ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. राघू कड हे (दि.१२) च्या सुमारास सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या स्वतःच्या दुचाकी (क्रमांक,एम.एम.१४/एचए ५९३७) वरून सुदवडी (ता.मावळ)येथे कामानिमित्ताने चाकण - आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी (ता.खेड ) येथील वाय जंक्शन येथून जात होते. त्याचवेळी पाठीमागून
पाण्याचा टॅक्टर नंबर (एमएच.१२,एचडी १३६४) वरील अज्ञात चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत टँकर चालकाने भरधाव वेगाने चालवत दुचाकीस मागून जोराची धडक दिली. धडक बसल्याने राघू कड हे रस्त्यावर खाली पडून टँकरचे पुढील चाकाखाली आल्याने त्यांच्या पोटास तसेच डोक्यास, हातपायास गंभीर दुखापत होऊन त्यात राघू कड यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
अपघातातील पाण्याचा टँकर हा खराबवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातातील टँकरचा चालक अपघात झाल्यानंतर अपघात स्थळावरून पसारा झाला आहे. यात महाळुंगे MIDC पोलीसांनी टँकरची कागदपत्रे, टँकर मालक, वाहतूक परवाना या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तपास सुरु केला आहे.
या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस मुल्ला हे करत आहेत.