BIG BREAKING : चाकण-तळेगाव रस्त्याच्या लगत दोन दुकानांना भीषण आग..!

BIG BREAKING : चाकण-तळेगाव रस्त्याच्या लगत दोन दुकानांना भीषण आग..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : चाकण-तळेगाव रस्त्यालगत साईदत्त सोसायटी समोर असणाऱ्या एका गिफ्ट हाऊसला व गॅरेजला भीषण आग लागल्याने दोनही दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण दुकानाचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश त्यांना मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीवरून, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पवन मानमोड नामक व्यक्तीचे हे दुकान असून साधारणतः दुकानात ५ लाख किमतीचा माल जळून खाक झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत..