अवनखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बासरी ठार...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील अवनखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.या बिबट्याचं त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.गुरुवार दि.२५ रोजी येथील शेतकरी संदीप जाधव दुपारी यांनी नेहमीप्रमाणे कादवानदी जवळ असणाऱ्या आपल्या शेतात दोन वासरी चरण्यासाठी बांधले होते. त्यावेळी तेथे अचानक बिबट्या येऊन त्याने सरत असलेल्या दोन वाजता वासऱ्यांवर अचानक हल्ला करून त्यांना ठार केले. त्यानंतर संदीप जाधव हे सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान वासरी घेण्यासाठी परत गेले असता तेव्हा त्यांच्या लक्षात आले. की आपल्या दोन्ही वासऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले आहे. याबाबत त्यांनी उपसरपंच मंगेश जाधव यांना घटनेची माहिती दिली. उपसरपंच जाधव यांनी ताततडीने वनविभागाला संपर्क साधला असता वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन वनक्षेत्रपाल अधिकारी पूजा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक योगेश दळवी आप्पा शिरसाट चेतन गवळी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी जाधव संदीप जाधव यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी व परिसरात असणाऱ्या बिबट्यांचा लवकरात लवकर पिंजरा लावून बंदोेबस्त करावा अशी मागणी सरपंच नरेंद्र जाधव,उपसरपंच मंगेश जाधव व शेतकर्यांनी केली आहे.
प्रतिक्रिया...
रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नये बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा आवाजाचा वापर करा रात्री फिरताना हातात काठी जवळ ठेवावी रात्रीच्या वेळी लहान मुले वृद्धांना एकटे सोडू नये पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठा करावा रात्री बाहेर झोपू नये त्याचप्रमाणे जर जनावरांना चारण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी बांधू नये व शेतकऱ्यांनी नेहमी सतर्क राहावे.
- पूजा जोशी वनपरिक्षेत्रपाला अधिकारी दिंडोरी