राजकीय घडामोडींना वेग; पुणे जिल्ह्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना जोर...

राजकीय घडामोडींना वेग; पुणे जिल्ह्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना जोर...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड, खेड

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी ९ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर १६ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्तास्थापनेसाठी पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.

९ मार्च रोजी दुपारी २ वाजता पंचायत समित्यांमध्ये सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. तर १६ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निर्णायक बैठक होणार असल्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष सत्ता स्थापनेचा टप्पा सुरू होत आहे. विविध राजकीय पक्षांकडून संख्याबळाची जुळवाजुळव, आघाड्यांचे गणित आणि पदवाटपाच्या चर्चांना जोर आला आहे. काही ठिकाणी गुप्त बैठका, तर काही ठिकाणी राजकीय डावपेच रचले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, ९ आणि १६ मार्च या दोन तारखा पुणे जिल्ह्याच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्तरांवरील नेतृत्व निश्चित होणार असल्याने सर्वांचे लक्ष या