राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या बैठक
![राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या बैठक](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66ed8e20dd9ad.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार अमोल कोल्हे आदी विविध मान्यवरांचे उपस्थितीत २४ सप्टेंबर रोजी दिंडोरी पेठ मतदारसंघात येत असून सदर यात्रेच्या पूर्व तयारीसाठी दिंडोरी पेठ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दि. २१ रोजी दुपारी एक वाजता परमोरी येथील ओम साई लॉन्स येथे होणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष खासदार भास्कर भगरे यांनी दिली.
यात्रेच्या पूर्व तयारीसाठी होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे,कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील,जिल्हा पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. बैठकीस विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी,गट गण प्रमुख,गाव प्रमुख,बूथ प्रमुख, सरपंच,उपसरपंच ,सदस्य,सोसायटी चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक व सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दिंडोरी तालुकाध्यक्ष खासदार भास्कर भगरे,पेठ तालुकाध्यक्ष दामू राऊत यांनी केले आहे.