दिंडोरी नगरपंचायतच्यावतीने वृक्षारोपण

दिंडोरी नगरपंचायतच्यावतीने वृक्षारोपण

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी  कार्य मंत्रालय (MOHUA) भारत सरकार यांनी  स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा मार्फत "स्वच्छ्ता ही सेवा अभियान"१४/०९/२०२४ ते २/१०/२०२४ व "स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता १७/०९/२०२४ ते ०२2/१०/२०२४ अंतर्गत दिंडोरी शहरात कादवा नगर येथे मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड मा के नाम-वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. 

या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष सौ.शैलाताई उफाडे, भारत खांदवे, जेष्ठ नागरिक संपत पिंगळे, अशोक नाईकवाडे ,प्रशासकीय अधिकारी विजय देवरे,नगर रचना सहाय्यक रणजित भालेराव,स्वच्छता निरीक्षक महेंद्र कांदळकर ,शहर समन्वयक पुरुषोत्तम जाधव ,लिपिक सचिन जाधव हर्षल बोरस्ते ,मुकादम अशोक गांगुर्डे  किरण सोळंकी, संदीप राऊत, सुरेश शिंदे, मनोज मवाळ उपस्थित होते.