BIG BREAKING : महाळुंगे इंगळे गावात झालेल्या तरुणाच्या खुनातील एका आरोपीला दरोडा विरोधी पथकाकडून अटक, तर इतर चार आरोपींना महाळुंगे MIDC पोलिसांनी घेतले ताब्यात..!

BIG BREAKING : महाळुंगे इंगळे गावात झालेल्या तरुणाच्या खुनातील एका आरोपीला दरोडा विरोधी पथकाकडून अटक, तर इतर चार आरोपींना महाळुंगे MIDC पोलिसांनी घेतले ताब्यात..!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : रविवार दिनाक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी महाळुंगे इंगळे गावात झालेल्या तरुणाच्या खुनातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकाने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी अभिराज शिवाजी जावळे(वय-२१ वर्षे) यांना दरोडा विरोधी पथकाकडून महाळुंगे MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर इतर चार आरोपींना २७ नोव्हेंबर २०२३ रोजी उशिरा महाळुंगे MIDC पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यातील छोटा साकेत नामक आरोपी अजूनही फरार असून महाळुंगे MIDC पोलिसांच्याकडून त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी २६ नोव्हेबर २०२३ रोजी दुपारी १२ :३० वाजताच्या सुमारास महाळुंगे गावातील हॉटेल रेणुका ते ग्रामपंचायतकडे जाणार्‍या रोडलगत प्रतीक गैस रीपेरिंग दुकानाजवळ मयत रितेश संजय पवार(वय-३१ वर्षे) उभा असताना पूर्ववैमंशातून आरोपी शंभू भोसले यांच्यात झालेल्या वादातून शंभू भोसले व त्याच्या इतर पाच साथीदारांनी रितेश उभा असलेल्या गैस रीपेरिंग दुकाना समोर रितेशवर हल्ला चढवला. हल्ला एवढा भयावह होता की, आरोपींनी रितेशच्या तोंडावर लोखंडी कोयत्याने व लाकडी दांड्क्यांनी मारहाण करून जीवे मारले. तसेच रितेशला जिवंतच सोडायचे नाही या उद्देशाने आरोपी वैभव आंधळे याने रितेशच्या पाठीवर लोखंडी कोयत्याने वार केले. तर इतर दोन आरोपी शेखर नाटक व छोटा साकेत यांनी त्याला जीव जाईल अशा पद्धतीने लाकडी दांडक्यांनी गंभीर मारहाण केली. त्यात रितेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र संदेश बाबुराव भोसले(वय-२१ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत आतापर्यन्त १) शंभू भोसले, २) अभि जावळे, ३) वैभव आंधळे, ४) विनोद बटलवार, ५) शेखर नाटक एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक आरोपी अजूनही फरार आहे.  

वरील घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याची पोलिस पथके त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील विविध पथके आरोपींच्या मागावर जाऊन त्यांनी २४ तासात आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अजूनही काही धक्कादायक खुलासे आरोपींच्या चौकशी अंती बाहेर येण्याची शक्यता आहे. वरील सर्व आरोपींच्यावर महाळुंगे MIDC पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ३०२, ३०७, १४३, १४६, १४८, १४९, आर्म अॅक्ट कलम ४(२५), क्रिम.लो. अमे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून आरोपींना २४ तासात अटक केल्याबद्दल पोलिस प्रशासणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  

वरील घटनेची कामगिरी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलिस निरीक्षक अबरीष देशमुख, पो. ह. उमेश पुलगम, गणेश हिगे, पोलिस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर यांनी एका आरोपीस अटक केली. तर महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सारंग चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलिस हवालदार युवराज बिराजदार,अमोल बोराटे, राजेंद्र कोणकिरे, विठ्ठल वडेकर, तानाजी गाडे, पोलिस नाईक संतोष काळे, पोलिस शिपाई शिवाजी लोखंडे, गणेश गायकवाड, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, राहुल मिसाळ, अमोल माटे, बाळा पाटोळे यांनी केली.