पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी...
![पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी...](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_65655a167975e.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
निफाड तालुक्यात रविवार दि. 26 रोजी काल झालेल्या अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाल्याने, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवार दि. 27 रोजी नुकसानग्रस्त भागाची तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील कसबे सुकेने येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पहाणी केली. यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांना धीर देऊन संवाद साधला.
लाखो रुपये खर्च करून या बागांना पोटच्या मुलासारखे सांभाळले जाते आणि काही क्षणात जमीनदोस्त झाल्याने संपूर्ण 'द्राक्षपंढरी' हादरून गेल्याने ही मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी राजा हतबल झाल्याने शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करून तात्काळ मदत कशी मिळेल अशी मागणी केली. यावेळी गारपीटग्रस्तांना धीर देऊन तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर करणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
यावेळी आमदार दिलीप बनकर माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, शेतकरी संतोष भंडारे, भारत मोगल, महेश भंडारे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.