साकोली तालुक्यात अवकाळी पावसाने रब्बी पीकाचे नुकसान...

साकोली तालुक्यात अवकाळी पावसाने रब्बी पीकाचे नुकसान...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, साकोली

साकोली तालुक्यामध्ये मंगळवार दि. 19 मार्चला सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक मेगर्जनेसह वादळ वाऱ्याने पाऊस कोसळल्याने रब्बी पीक मातीमोल झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झालेला आहे.

रब्बी हंगामात शेतकरी गहू, हरभरा,भाजीपाल्यांसह इतर पिकांची लागवड करतात. या वर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली. त्यात इतर पिकांपेक्षा तालुक्यात गहू,हरभरा व पीक कापणीला आले असताना, मंगळवारी वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांचं अतोनात नुकसान केले आहे.त्याचा शेतातील कापलेल्या व उभा असलेल्या पिकांना चांगलाच फटका बसलेला आहे. सात आठ नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मोबदला देण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 लाखनी, लाखांदूर तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार मुसंडी मारली. तासभर झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची तसेच लहान व्यवसायिकांची मोठी तारांबळ उडाली. काही शेतकऱ्यांचे कडधान्य पीक ओले चिंब झाली असून,याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.