जिल्ह्यात मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग
![जिल्ह्यात मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_6663f95102bd7.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, लातूर
शिरूर अनंतपाळ : लातूर जिल्ह्यातील विविध भागात खरीप हंगामासाठी शेतीच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतलाय. येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन होण्याचा असल्याने, सध्या मशागतीची कामे करण्यात शेतकरी गुंतलाय.
दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज असून, यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची, ७५ हजार हेक्टरवर तूर आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलाय. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासून घेण्याचे आणि ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावर पेरणी करण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय.