दूषित पाणी पिल्याणे नागरिकांना मळमळ, उलटी व जुलाबचा त्रास.! 300 पेक्षा अधिक नागरिक रुग्णालयात दाखल...

दूषित पाणी पिल्याणे नागरिकांना मळमळ, उलटी व जुलाबचा त्रास.! 300 पेक्षा अधिक नागरिक रुग्णालयात दाखल...

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड

नादेड तालुक्यातील नेरली गावातील ग्रामपंचायत पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी पिल्याने; अख्ख गाव हैराण झालं असून, या दूषित पाण्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याची माहिती देण्यात येत आहे.

गावातील नागरिकांना रात्री अचानक मळमळ, उलट्या,जुकबचा त्रास सुरू झाला. मध्यरात्रीपर्यंत गावातील 300 हुन अधिक नागरिकांना शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. नेरली गावात सध्या आरोग्य पथक तळ ठोकून आहे. रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे.

सायंकाळी सहा वाजता काही नागरिकांना याचा त्रास सुरू झाला होता. रात्री उशिरापर्यंत मात्र संपुर्ण गावात रुग्णांची संख्या वाढू लागली. आमदार बालाजी कल्याणकर त्यासोबतच राजकीय नेत्यांनी देखील गावात धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्ण संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.