वाढत्या तापमानामुळे पक्षांना उस्माघाताचा सर्वाधिक धोका...
![वाढत्या तापमानामुळे पक्षांना उस्माघाताचा सर्वाधिक धोका...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_662a388e2c398.jpg)
प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा
जिल्ह्याचे तापमान वाढले आहे. त्यातच उन्हाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पक्ष्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही. त्यामुळे पक्षांना उस्माघाताचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती पक्षी मित्रांनी दिली.
प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि प्रदूषण त्यामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनुष्य पाण्याची व्यवस्था कशी करू शकतो? परंतु पशु काय करायचे? अति उष्णतेचा सर्वात मोठा फटका लहान पक्षांना बसतो. पाण्याच्या शोधामध्ये फार लांब जाऊ न शकल्याने लहान पक्षी उष्णतेमुळे घेरी येऊन पडतात. उन्हाळ्यात पक्षांना ग्लुकोज युक्त अन्नाची आवश्यकता असते. ती गरज भागवण्यासाठी पक्षी पळस, काटेसावर, पांगरा या फुलातील मकरंद पिऊन आणि उंबरवर्गीय झाडे जसे उंबर, पिंपळ,वड अशा वृक्षांची फळे खाऊन वाढत्या तापमानाशी लढत असतात. परंतु प्रचंड प्रमाणात वृक्षतोड आणि वाढते शहरीकरणामुळे पक्षांच्या खाण्याची आणि पिण्याची गैरसोय व्हायला लागली. ऊकाळ्याचा परिणाम पक्षांवरही दिसून येत आहे.