वणी ग्रामीण रुग्णालयाचा प्रताप, गरोदर महीलेची तपासणी नाकारली.! तर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाने केली प्रस्तुती...

वणी ग्रामीण रुग्णालयाचा प्रताप, गरोदर महीलेची तपासणी नाकारली.! तर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाने केली प्रस्तुती...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : सुरगाणा येथून वणी ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महीलेची तपासणी करण्याचे औचित्यही न दाखविता; या महीलेला नाशिक येथे पाठविण्याचा सल्ला देणाऱ्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून, सदर महीलेची प्रसुती दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात बुधवारी रात्री ९ च्या सुमारास करण्यात आली. तर वणी ग्रामीण रुग्णालयाच्या असंवेदनशील भुमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, या घटनेने सर्वसमान्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

याबाबत प्राप्त माहीती अशी; सुरगाणा येथील मीना थविल वय २४ ही महीला गरोदर असल्याने १०८ या अॕब्युलेन्समधून आशावर्कर लता महाले यांचे समवेत वणी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आले. याबाबतची माहीती डाॕ.गायधनी व बागुल यांना दिली. मात्र त्यानी सदर महिलेला वाहनाच्या खालीही उतरु दिले नाही व तपासणी करण्याची टाळाटाळ करत; नाशिकला घेऊन जा असे सांगितले. नाईलाजाने थविल यांना नाशिकला हलविण्यासाठी १०८ हे वाहन मार्गस्थ झाले. दरम्यान थविल यांना असह्य कळा येऊ लागल्या व पोटात दुखु लागल्याने, वेदनेने त्या खूप त्रासल्या होत्या. अखेर दिंडोरी येथे रात्री ९ वा. च्या सुमारास थविल याना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच त्याना प्रसुती झाली. वणी ग्रामीण रुग्णालयाची असंवेदनशीलता यामुळे दिसून आली.

देशाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या भागाचे प्रतिनीधीत्व करतात; मागील आठवड्यात त्यांचे हस्ते भुमीपुजन व लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. संपुर्ण वातानुकुलीत व्यवस्था वणी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध असताना; थविल प्राथमिक तपासणी व प्रसुती उपचार का करण्यात आले नाही. याची विचारणा वैद्यकीय अधिक्षक डाॕ. मोरे यांना प्रस्तुत प्रतिनीधी यांनी केली असता सदरबाब गंभीर असून, कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येते. सिव्हील सर्जन यांना याबाबत माहीती दिली असून, गायधनी व बागुल यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहीती त्यानी दिली. वणी ग्रामीण रुग्णालय सातत्याने वेगवेगळ्या कारणाने प्रकाश झोतात असते. आता सुरगाणा येथील गर्भवती असलेल्या महिलेची साधी तपासणी करण्याचे सौजन्य ही दाखविले नाही. मग मात्र लाखो रुपये आरोग्य विभागासाठी खर्च करणारे लोकप्रतिनीधी याचा जाब विचारणार का व संबंधितांवर कारवाई होणार का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

 प्रतिक्रिया

दरम्यान सिव्हील सर्जन अशोक थोरात यांचेशी याबाबत संपर्क साधला असता कर्तव्यावर असलेल्या डाॕ. गायधने व पारीचारीका बागुल यांना नाशिक येथे चौकशी कामी बोलावुन घेतले असुन चौकशी अंती कारवाई करणार असल्याची माहीती त्यांनी दिली.