जखमी नागाला सर्पमित्र, पशुवैद्यकीय डाॅक्टर आणि वनविभाग यांच्या कडून जिवनदान...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील कादवा माळुंगे येथे रविवार दि.२० रोजी सिगराम या कंपनीमध्ये JCB च्या सहाय्याने खोदकाम चालू असताना; दगडाच्या ढिगार्याखाली नाग हा जखमी अवस्थेत अडकून बसला होता. कंपनीमधील सुपरवाॅहिजर रफिक शेख यांनी दिंडोरी येथील तालुकाप्रमुख सर्पमित्र दिपक धामोडे व सहकारी ऋषिकेश सुर्यवंशी, बंन्टी शार्दूल, आदेश लांडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून पाचारण केले.
त्यानंतर सर्पमित्रांनी त्या जखमी नागाला सुखरूप पकडून दिंडोरी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले आणि दिंडोरी वनविभागचे अधिकारी आशेक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोरख गांगोडे हे त्या ठिकाणी दाखल झाले. पशुवैद्यकीय डॉ. पन्हाळे व त्यांची सहकारी मित्र यांनी त्या जखमी नागावरती योग्य ते उपचार केले. त्यानंतर त्याला बरा करून निसर्ग सानिध्यात सोडला जाईल असे सांगितले.