बदलत्या जीवन पद्धतीमुळे आजारात वाढ...

बदलत्या जीवन पद्धतीमुळे आजारात वाढ...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडारा

गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वीचा काळव सध्याची स्थिती पाहता असे दिसून येते की, शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुद्धा आमूलाग्र बदल झालेला दिसून येत आहे. परिणामतः रसायन युक्त आधुनिक युगात झपाटाने बदललेल्या जीवनपद्धतीमुळे नागरिकांचे रोगप्रतिकारक शक्ती क्षिण झाली असून,अनेक आजारात वाढ झाली असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे.

कसाई बनलेले सर्व डॉक्टर समाजात गर्भ श्रीमंत म्हणून ऐटीत जीवन जगत आहे. एक एडिस मच्छर माणसाला पार वाकवून टाकतो व त्याचा फायदा औषधींचा व्यापार करणाऱ्या डॉक्टरांना व औषधी दुकानदारांना होतो. कोरोना काळात  तर दोन वर्ष डॉक्टर आणि औषधी विक्रेते दुकानदारांनी नागरिकांच्या धास्तीचा फायदा घेत नागरिकांची  लूट करून अमाफ पैसा कमावला आहे. हाच प्रकार दहा ते पंधरा वर्षे अगोदर चिकनगुनियाची साथ आली असताना घडला होता. शहरासह ग्रामीण भागातील आजूबाजूच्या परिसरातील डॉक्टरांच्या आर्थिक प्राप्तीकडे लक्ष दिल्यास असे दिसून येते की, खेड्यातील एखाद्या डॉक्टरने वर्षभरात एकही पेशंट न करता त्यांचे काहीच बिघडू शकत नाही. कारण पुढच्या पिढीला पूर्णरा आवश्यक तेवढी आर्थिक प्राप्ती चिकनगुनिया व कोरोनाच्या साथीत कमावली आहे. नागरिकांच्या मजबुरीचा फायदा घेत सर्वांचा पैशाचा वाढलेला हव्यास रसायन व भेसळयुक्त युगात बदललेली जीवन पद्धती व कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती यामुळेच मानवाच्या आजारात वाढ झाली असून आरोग्य रोगट झाले आहे.