शेतकऱ्यांना मोठा दिलासा.! २ लाखांपर्यंतच्या कर्जावर मुद्रांक शुल्क माफ...
ब्युरो रिपोर्ट - मुंबई
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृषी व पीक कर्जाशी संबंधित २ लाख रुपयांपर्यंतच्या कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्यात आले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून, हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून राज्यभर लागू झाला आहे.
या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.