कृषी_कन्यांच्या कृषी प्रदर्शनाला कोराटे ग्रामस्थांचा भरभरून पाठिंबा...

कृषी_कन्यांच्या कृषी प्रदर्शनाला कोराटे ग्रामस्थांचा भरभरून पाठिंबा...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मराठा विद्या प्रसारक नाशिक संचालित क.दू.सि.पा.कृषी महाविद्यालयात शिकत असलेल्या अंतिम वर्षाच्या कृषीकन्यांद्वारे गावामधील मारुती मंदिराच्या प्रांगणातील सभामंडपात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, प्रा.एस. सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीप्रदर्शन भरवण्यात आले होते.

यावेळी कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना आपल्या परिसरामध्ये व सभोवताली असणाऱ्या वनस्पतींची माहिती देऊन या वनस्पतींचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी कृषीकन्यांचे कौतुक करून त्यांना पाठिंबा दिला. विद्यालयाचे डॉ.प्रा.बी.डी.भाकरे, प्रा.कविता पानसरे यांचे मार्गदर्शन लाभले. कृषी प्रदर्शन यशस्वीतेसाठी कृषीकन्या वैष्णवी घोंगडे, वेदिका घुगे साक्षी हांडगे, संपदा जाचक, दुर्गा जोंधळे सृष्टी कदम, मृदुला केंग यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी सरपंच अश्विनी दोडके, उपसरपंच बाळासाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.