पालखेड बंधारा येथे आज खंडेराव महाराज यात्रा उत्सव...

पालखेड बंधारा येथे आज खंडेराव महाराज यात्रा उत्सव...

NEWS15 मराठ प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज सोमवार दि.२९ रोजी आराध्य दैवत खंडेराव महाराजांची दोन दिवस यात्रा भरत असून, २ दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सकाळी नऊ ते दहा या वेळेत खंडेराव भक्तांनी चांदोरी येथून आणलेल्या पवित्र जलाने खंडेराव महाराज यांच्या मूर्तीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा जलअभिषेक होईल. दुपारी ११ ते २ या वेळेत खंडेराव महाराज रथ मिरवणूक, तीन ते चार या वेळेत गळ टोचणे, नवस्फूर्ती व सायंकाळी यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढणे या बारा गाड्या ओढण्याचे काम खंडेराव महाराज भक्त पंढरीनाथ गोतरणे हे करणार असून, रात्री स्थानिक स्तरावर लोकनाट्य तमाशा होणार आहे.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी  यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीने करण्यात आले आहे.