सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराजांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - प्रा.दत्ताभाई प्रभाळे यांचे आवाहन...

सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराजांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - प्रा.दत्ताभाई प्रभाळे यांचे आवाहन...

N15 मराठी रिपोर्ट - बीड (राजेश देवडकर)

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी; शिदोड येथे सप्तखंजरीवादक सत्यपाल महाराजांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमास बीड आणि शिदोड परिसरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संखेने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन; सामाजिक कार्यकर्ते प्रा. दत्ताभाई प्रभाळे यांनी केले आहे.

यावेळी दत्ताभाई प्रभाळे म्हणाले की.! सप्तखंजिरी वादक, प्रबोधनकार श्री.सत्यपालजी महाराज गेल्या ५० वर्षांपासून आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा सत्यपाल महाराजांनी पुढे नेला आहे. सत्यपाल महाराजांचे कीर्तन म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीच असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या जीवनाचे विविध पैलू समजून घेता आले. सत्यपाल महाराज यांच्या भेटीतून नेहमीच एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते.

तर आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 वी जयंतीनिमित्त समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम समाजसुधारक सप्तखंजीरीवादक सत्यपाल महाराज दि. 31 मे 2024 रोजी सांय.7:00 वाजता शिदोड. ता. जि.बीड येथे येत असून, आपणही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा . दत्ताभाई प्रभाळे,  यांनी केले.