जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण समारोप...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याकरीता; जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे किनगाव मराठी पत्रकार संघाच्यावतीने दि.३ आणि ४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. तर ह्या 2 दिवस चाललेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरणाने समारोप झाला आहे.
या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १५ हजार रु व सन्मान चिन्ह व सन्मान पत्र माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते किनगाव जिल्हा परिषद प्रशालाच्या समूह नृत्यास देण्यात आला तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रु व सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते वयक्तिक नृत्य सादर केलेल्या प्राची सचिन गायकवाड व श्रमिका श्रीराम सूर्यवंशी या दोघींना विभागून देण्यात आले. तृतीय पारितोषिक माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्यावतीने संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूरच्या समूह नृत्यास देण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन किनगाव मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष गोरख भुसाळे, उपाध्यक्ष असलम शेख, सचिव जाकेर कुरेशी, सहसचिव अन्वर बागवान, समन्वयक शेटिबा शृंगारे, सदस्य रोकडोबा भुसाळे, रुद्रा मुरकुटे, रत्नाकर नळेगावकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरभद्र शेळके, ऋषी महाजन बस्वराज हुडगे, कौशल्या पवार यांनी केले. तर प्रास्ताविक जाकेर कुरेशी व असलम शेख यांनी केले आणि आभार गोरख भुसाळे यांनी मानले.
यावेळी शिफा पुणेकर यांच्या पोलीस वाल्या गाण्यावर २ वर्षीय बाळाने ठेका चांगलाच धरला शिफा पुणेकर यांचा लावणीचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.