वलखेड येथे दि.१७ रोजी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम
![वलखेड येथे दि.१७ रोजी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e59fc35068c.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे एकता कला क्रीडा व बहुउद्देशीय संस्था यांचे तर्फे सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मंगळवार दि.१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. होणार आहे.
वलखेड येथील महादेव मंदिरा जवळ असणाऱ्या संभाजी राजे सभा मंडप येथे एकता मित्र मंडळाकडून गणेश उत्सवानिमित्त खेळ रंगणार पैठणीचा हा कार्यक्रम एकता ग्रुपचे अध्यक्ष विनायक शिंदे यांचे संकल्पनेतून खास महिलांसाठी होणार असून या कार्यक्रमास प्रथम बक्षीस सोमनाथ जाधव यांच्याकडून फ्रिज व पैठणी, दुसरे बक्षीस सतीश पाटील यांचे तर्फे वाशिंग मशीन, तिसरे बक्षीस शिवाजी पिंगळे यांचे कडून एलईडी टीव्ही, चौथे बक्षीस एकनाथ अनवट यांचे तर्फे ओव्हन, पाचवे बक्षीस अनंत पाटील यांच्यातर्फे मिक्सर, उत्तेजनार्थ बाळासाहेब पाटील यांच्याकडून पैठणी असून कार्यक्रमासाठी वामन पाटील (पो.पाटील), सुजित पाटील, सुदाम शिंदे, हिरामण पाटील, योगेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमास गाव व परिसरातील महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन एकता कला व क्रीडा ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.