दिंडोरीत आज ग्रामीण साहित्य संमेलन...

दिंडोरीत आज ग्रामीण साहित्य संमेलन...

प्रतिनिधी बापू चव्हाण - नाशिक

दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंच आयोजित ग्रामीण साहित्य संमेलन आज रविवार दि.7 जानेवारी रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कर्मवीर रावसाहेब थोरात साहित्यनगरीत,कर्मवीर दादोसाहेब गायकवाड सभागृह,आदिवासी सांस्कृतिक भवन,शिवाजीनगर दिंडोरी येथे आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे,उद्घाटक प्रसिध्द व्याख्याते अविनाश भारती, समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येेष्ठ साहित्यिक प्रा.गंगाधर अहिरे, स्वागताध्यक्ष तुषार वाघ राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द कवी अनंत राऊत,सुप्रसिध्द चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. यशवंतराव पाटील, प्रा. लक्ष्मण महाडिक, विवेक उगलमुगले, सुरेश पवार,मा. आ. नानासाहेब बोरस्ते,पुंजाजी मालुंजकर,शिवाजीराव ढेपले, हिरामण झिरवाळ,नगराध्यक्ष कल्पना गांगोडे,उपनगराध्यक्ष दिपक जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहे. 

सकाळी 8.30 वाजता दिंडोरी नगरपंचायत ते संमेलनस्थळ ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर संमेलनस्थळी प्राचार्य रमेश वडजे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागत गीत गायन सठहीयन आयडॉन फेम प्रतिक सोळसे करणार आहे. प्रास्ताविक संयोजन समिती अध्यक्ष डॉ. विलास देशमुख करणार आहे तर साहित्य संमेलनाविषयी विषय भुमिका प्रिुख कार्यवाह वठ्ठलतात्या संधान हे करणार आहेत. स्वागताध्यक्ष तुषार वाघ यांच्या मनोगतानंतर उद्घाटकीय मनोगत अविनाश भारती व्यक्त करणार आहे. 

नया संमेलनाध्यक्ष विजयकुमार मिठे हे मनोगत  व्यक्त करणार आहे. पिंहल्या सत्राचे अध्यक्षीय मनोगत प्रा. गंगाधर अहिरे हे करणार आहे. या उद्घाटन सत्रामध्ये आजींचं पुस्तकांचे हॉटेल संचालिका भिमाबाई जोंधळे यांना जीवनगौरव,पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना लोकसेवक सन्मान, श्री अष्टवाहु गोपालकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला,मोहाडी यांना संस्था सन्मान,मित्र मंडळ सार्वजनिक वाचनालय दिंडोेरी यांना स्माननित करण्यात येणार आहे. दुसरे सुत्र कवी प्रा.संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली  प्रसिध्द कवी अनंत राऊन यांचे व्याख्यान होणार आहे. यामध्ये प्रगतशील शेतकरी काका जाधव यांना कृषी उद्योग रत्न, पाडे येथील साहित्यिक डॉ.गोपाल गवारी यांना साहित्यरत्न,तळ्याचापाडा येथील गोपीनाथ पाटील यांना लोकसन्मान,दिंडोरी येथील डॉ.योगेश थिगळे यांना वैद्यकीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तिसर्‍या सत्रात होणार्‍या निमंत्रितांचे कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिध्द चित्रपट गीतकार अभिनेते बाबासाहेब सौदागर राहणार आहे. या कवी संमेलनात जिल्ह्यातील अनेक कवी आपले कविता सादर करणार आहेत.या सत्रात जालखेडचे कुस्ती पटू शुभम मोरे यांना क्रिडारत्न तर सारंग घोलप यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या एक दिवशीय संमेलनाचे समारोप सत्र सुप्रसिध्द कवी प्रा. लक्ष्मक्ष महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी संयोजक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन तुषार वाघ, डॉ. विलास देशमुख, विठ्ठलतात्या संधान, राजेंद्र गांगुर्डे, नितीन गांगुर्डे,समाधान अपसुंदे, गोकूळ आव्हाड, बापू चव्हाण, अशोक निकम यांच्यासह संयोजन समिती पदाधिकारी, सदस्यांनी केले आहे.