वलखेड येथे दि. २७ रोजी; नृत्यांगना गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम...
![वलखेड येथे दि. २७ रोजी; नृत्यांगना गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_651179b20cd71.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथील एकता कला आणि क्रीडा मंडळ सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने; गणेश उत्सवानिमित्ताने बुधवार दि.२७ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सरपंच विनायक शिंदे यांच्या संकल्पनेतून, गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर कार्यक्रमास येणार्या सर्वांनी शिस्त पाळावी, व्यासपीठावर कुठलाही गोंधळ घालू नये असे आवाहन; कार्यक्रम संयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नृत्य कलेचा अविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम असून, महाराष्ट्राची लोककला असल्याने त्या लोककलेचा नागरिकांनी आनंद घ्यावा पण त्यात कुठलीही प्रकारची हुल्लडबाजी किंवा वादविवाद, कुठल्याही चुकीचे कृत्य करू नये, जेणेकरून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पडेल अशी साद नागरिकांना व युवकांना घालण्यात आली आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा शांततेत आनंद घ्यावा व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा असे आवाहन दिंडोरी पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी केले आहे.