बंजारा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न...

बंजारा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न...

NEWS15 प्रतिनिधी : जळगाव

जळगाव बंजारा स्पोर्ट फाउंडेशन संचलित बंजारा प्रीमियर लीगतर्फे समस्त बंजारा समाज एकत्र यावा या उद्देशाने; समाजातील युवकांसाठी युवकांतर्फे तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ६ एप्रिल रोजी स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून, यावर्षी १२ संघ आपल्या संघ मालकांसह सहभागी झाले होते. यात जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील खेळाडू युवकांनी सहभाग घेतला होता. बंजारा प्रीमियर लीग मध्ये सेवालाल प्रतिष्ठान संघ विजयी संघाने मिळवले.

यावेळी मुख्य प्रायोजक रमेश चव्हाण, सह प्रायोजक, शैलेश पवार, रवींद्र पवार, सुभाष जाधव (माजी गटविकास अधिकारी) भारमल नाईक, डॉ. कृष्णा राठोड, डॉ. प्रवीण राठोड, नीलेश चव्हाण, भाऊल चव्हाण, गोपाल पवार, अजित चव्हाण, किरण जाधव, अशोक राठोड, अक्षय पवार, सुनील धाडी, अभिजित चव्हाण, अनिल राठोड उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी काशिनाथ चव्हाण, सुनील नाईक, पपेश चव्हाण, बादल नाईक, अतुल चव्हाण विशाल चव्हाण यानी परिश्रम घेतले.

या क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यात अंतिम सामन्यात सेवालाल प्रतिष्ठान संघाने लाखा गोर सनरायजर्स संघावर विजय मिळवला. त्यात जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील खेळाडू युवकांनी सहभाग घेतला होता. हे सामने तीन दिवस-रात्र पद्धतीने पार पडले. अंतिम सामना हा लाखा गोर सनरायझर्स विरुद्ध सेवालाल प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये झाला.  यात विजयी होऊन प्रथम पारितोषिक सेवालाल प्रतिष्ठान संघाने मिळवले, तर द्वितीय पारितोषिक लाख गोर सनरायझर्स संघाने पटकावले