आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेमध्ये घवघवीत यश...

आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेमध्ये घवघवीत यश...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

श्री चैतन्य टेक्नो स्कूल येथे तालुकास्तरावरील अंडर -१४ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये दिंडोरी व नाशिक तालुक्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित या स्पर्धेमुळे दोन्ही तालुक्यांतील उदयन्मुख खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. यामध्ये आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरीचा विद्यार्थी कु.आदर्श कृष्णकांत यादव याने पंधराशे मीटर तसेच १०० मीटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला,तसेच कु. करण सुनील गोतिसे यांनी २०० मीटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर कु.यश संदीप मालसाने कु.यश अनिल कोठेकर कु.कृष्णा विशाल गडकरी कु.आयुष हिरामण पाटील कु.प्रज्वल प्रशांत निकम यांनी ४X१००m रीले मध्ये प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.

त्याचबरोबर मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय इंडियन आर्चरी स्पर्धेमध्ये आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थिनी कु. श्रेया राजेश दाने हिने प्रथम क्रमांक पटकावून तिची विभागीय स्तरावर निवड झाली आहे या सर्वच विद्यार्थ्यांचे शालेय स्तरावर तसेच संस्था स्तरावर कौतुक होत आहे. शाळेच्या प्राचार्या. निर्मला जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे क्रीडा शिक्षक रुपेश गायकवाड तसेच पालकांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छाही दिल्या.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲड .प्रदीप घोरपडे, व सर्व सदस्यांनी तसेच म.वि.प्र. संचालक प्रवीण नाना जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व असेच यश संपादन करत रहा, यातून शाळेचे व संस्थेचे नावलौकिक नक्कीच होईल असे सांगितले.