कोराटे जनता विद्यालय येथे श्री गणेशाचे विसर्जन...
![कोराटे जनता विद्यालय येथे श्री गणेशाचे विसर्जन...](https://news15marathi.com/uploads/images/202309/image_750x_65127669c2be0.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय कोऱ्हाटे विद्यालयात; गणपतीचे विसर्जन अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मंगेश कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कदम, सौ. विद्या कदम, मुख्याध्यापिका पी. आर. देशमुख मॅडम आदी उपस्थित होते.
अतिशय भक्तीमय वातावरणात श्री गणेशांच्या विसर्जनाची तयारी पर्यावरण पूरक पध्दतीने करण्यात आली. शालेय समिती सदस्य प्रशांत कदम व सौ विद्या कदम यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. विसर्जनाच्या सोहळ्यासाठी आबासाहेब शिंदे यांनी प्रसादाचे नियोजन केले. विद्यालयाच्या गीत मंचने आरती, गणपती स्तोत्र, मंत्रपुष्पांजली यांचे गायन करून एक वेगळी शोभा कार्यक्रमास आणली. सांस्कृतिक समिती प्रमुख श्रीमती हर्षाली सावंत श्रीमती वैशाली जथे, श्रीमती मानिनी धोंगडे, श्रीमती रूपाली जाधव व श्रीमती अर्चना यांनी केले. व अतिशय सुरेख पूजा व आरस गणपती साठी त्यांनी तयार केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.