पाटणबोरी येथे दि. १९ पासून भव्य कबडडीचे खुले सामने...

पाटणबोरी येथे दि. १९ पासून भव्य कबडडीचे खुले सामने...

प्रतिनिधी - गजू कैलासवार,

यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, पाटणबोरी येथिल जिजामाता छात्रावासच्या मैदानावर दि.१९ फेब्रुवारी पासून भव्य कबडडीचे प्रेक्षणिय खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर यात लाखो रूपयांच्या बक्षीसांची लयलूट होणार असल्याची माहिती आयोजकां मार्फत प्रसिध्दी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.

भारतीय स्वदेशी लोकांचे सवंर्धन व्हावे हा उदात्त हेतू ठेवून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे सामने आयोजित करण्यात आले असून तरूणांचा कल मैदानी खेळाकडे वळावा हा देखिल या सामन्यांचा मुख्य उद्येश असल्याचे आयोजकांनी सांगितले असून सामन्यांच्यां यशस्वीतते करीता गावातील ३०० हून अधिक किडा प्रेमी तरूण यंत्रदिवस झटत आहेत. दि. १९ रोजी होणाऱ्या उदघाटन सोहळयास माजी केन्द्रीय मंत्री श्री. हंसराजजी अहिरां सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून प्रो कबडडीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कबडडी पटू श्री. शशांक वानखडे उत्साह वाढविण्या करीता उपस्थित राहणार आहे. शंभराहून अधिक गावांमधील संघ या सामन्यांमध्ये सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

भारतीय खेळांचा प्रचार प्रसार व्हावाः कपिल दरवरे (अध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य) भारतीय तथा मैदानी खेळांचा प्रचार- प्रसार व्हावा याकरीता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेद्र मोदी यांनी सर्वच खेळाडूंना प्रात्साहन दिले असून त्याच धर्तीवर आपल्या ग्रामणि भागातही भारतीय व मैदानी खेळांचा प्रचार प्रसार व्हावा याकरीता सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून मा. श्री. हसंराजजी शैय्या अहिर तथा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात हया सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून सामन्यांच्या यशस्वीते करीता गावातील सर्वच वर्गातून सहकार्य मिळाले आहे. पाटण्णबोरीच्या ईतिहासातील आजवरचा सर्वात भव्य किडा सोहळा आपल्या सर्वांना पाहता येणार आहे. दि. १९ पासून २३ पर्यंत दिवस रात्र हे सामने चालणार असून सांघीक बक्षींसांची देखील लयलूट होणार असल्याचे किडा प्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 

मंडळ तथा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मंडळ तथा गावातील कोणतीही चमू स्पर्धेत सहभागी होणार नसून बाहेर गावांहून आलेल्या सर्व खेळाडूं करीता राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. समाजाच्या सर्वच स्तरांमधून हे सामने यशस्वी व्हावेत याकरीता प्रयत्न सुरू असून गावच्या सरपंच सौ. निताताई उप्परवार यांसह उपसरपंच सौ. निलिीमाताई कायतवार व सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष सहकार्य केले असून परिसरातील सर्व किडाप्रेमींनी या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.