राज्यस्तरीय यशवंत गौरव महिला रत्न पुरस्कार जाहीर.! महिलादिनी दिंडोरीतील रणरागिणींचा गौरव...

राज्यस्तरीय यशवंत गौरव महिला रत्न पुरस्कार जाहीर.! महिलादिनी दिंडोरीतील रणरागिणींचा गौरव...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

सामाजिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कृषी व शासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिंडोरी तालूक्यातील रणरागिणीना राज्यस्तरीय यशवंत गौरव महिला रत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने, महिला दिनाचे औजित्य साधत दिंडोरी तालूक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस पाटील अर्चना अनवट (कादवा माळुंगी ) सामाजिक कार्यकर्त्या उज्वला शिंदे, कविता पगारे, कविता लिलके, ताई राऊत, शैला बत्तीशे निर्मला खांडवी, कविता गायकवाड यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र  देऊन गौरवण्यात येणार आहे.

त्यांच्या या पुरस्काराबद्दल विधान परिषद विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.भारती पवार, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, आमदार हिरामण कोसकर, विजय साने, भगवंतराव टोचे आदींनी अभिनंदन केले आहे.