हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा...!

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा...!

News15 मराठी प्रतिनिधी नारायण काळे 

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी न्यायालयात संविधान दिनाच्या निमित्त भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे दिवाणी न्यायाधीश व्ही.एच.विश्वास व सहदिवाणी न्यायाधीश यु.एस.एम.अल्मोदी यांच्या मार्फत सामुहिक वाचन करून संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिनानिमित्त कळमनुरी न्यायालयात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश व्ही.एच.विश्वास यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात नागरिकांचे संविधानिक मुल्य आणि कर्तव्य या बद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच घटनाकार यांच्या दूरदृष्टीमुळे आजचे भारतीय संविधान किती प्रतिभाशाली आणि महत्वाचे आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर सहदिवणी न्यायाधीश यु.एस.एम. अल्मोदी यांनी भारतीय संविधानाचा सार विविधतेतून एकात्मता दर्शवितो त्यामुळे भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ आहे असे सांगितले.

वकील संघ कळमनुरीचे सदस्य ॲड.एल.एल.शिरसाठ यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातुन संविधानाचे कार्य आणि महती यावर प्रकाश टाकला. ॲड.रवी शिंदे यांनी आज चौऱ्यहात्तर वर्षा नंतर सुद्धा भारतीय संविधान कसे कार्यक्षम आणि त्याची क्षमता टिकून ठेवत आहे त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक आज आपले विचार, मत स्वतंत्र पने समाजासमोर मांडत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असे मनोगत मांडले.

कार्यक्रमाला उपस्थित वकील संघ अध्यक्ष ॲड.टी.पी.देशमुख,उपाध्यक्ष ॲड.एस.टी.नरवाडे,सचिव ॲड.अरुण दांडेकर,सहसचिव ॲड.प्रदीप तडस,ग्रंथालय उपाध्यक्ष ॲड.प्रभाकर मोरे, कोषाध्यक्ष ॲड.शकील रझवी, ॲड.एम.आय.अश्रफी,ॲड.अझरुद्दीन कादरी,ॲड.लुगडे पाटील,ॲड.डि. एस.पाईकराव,ॲड.सतीश पंडित,ॲड.जे.आर.जाधव,ॲड.इलियास नाईक,ॲड.अविनाश काळे पाटील,ॲड.सुरेश गरड, ॲड.के पी.जोंधळे,ॲड.वाघमारे,ॲड.व्ही.एच.खंदारे,ॲड.सुनील घोंगडे,ॲड.सोनुले,ॲड. काजल वर्मा,ॲड.खिल्लारे,ॲड.अमोल डिग्गीकर तसेच न्यायालयाचे कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.मोहम्मद एकबल यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड.मल्हारी खोकले यांनी केले.